Ad will apear here
Next
स्वा. सावरकरांवरील ‘हे मृत्युंजय’ नाटकाचा १६ मे रोजी रत्नागिरीत प्रयोग


रत्नागिरी :
भाषाशुद्धीपासून स्वातंत्र्यलढ्यापर्यंत अनेक क्षेत्रांत अद्वितीय कामगिरी केलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. त्यांच्या अंदमानमधील शिक्षेच्या कालावधीवर आधारित असलेल्या ‘हे मृत्युंजय’ या नाटकाचा प्रयोग १६ मे रोजी रत्नागिरीत म्हणजेच स्वातंत्र्यवीरांच्या कर्मभूमीत होणार आहे. श्री पतितपावन मंदिर संस्थेचे अध्यक्ष अॅ ड. बाबासाहेब परुळेकर यांनी रत्नागिरीत झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. 

पतितपावन मंदिराच्या आवारातील सावरकर स्मारकामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेला आनंद मराठे, दलितमित्र एस. बी. खेडेकर, जयाशेठ रेडीज, कौस्तुभ सावंत, सुहास ठाकुरदेसाई उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे ‘हे मृत्युंजय’ नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे. गुरुवारी (१६ मे) सायंकाळी सात वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात प्रयोग होणार आहे. सावरकरांचे विचार विद्यार्थी, युवकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आला आहे. नाट्यप्रयोगासाठी विनामूल्य प्रवेशिका पतितपावन मंदिर, गाडीतळावरील एम. आर. इलेक्ट्रिकल, मारुती मंदिर येथील अभिनव वस्तू आणि कुवारबाव येथील समर्थ कृपा येथे उपलब्ध आहेत; मात्र प्रवेशिका नसल्या तरी आयत्या वेळीही प्रवेश दिला जाणार आहे. नाटक पाहिल्यावर प्रेक्षकांनी स्वेच्छामूल्य म्हणून आपल्याला वाटेल तेवढी रक्कम द्यायची आहे.

या नाटकाद्वारे सावरकरांचे प्रेरणादायी विचार समोर आणण्याचे प्रयत्न राष्ट्रीय स्मारक करत आहे. या नाटकाचे आतापर्यंत ५८ प्रयोग झाले आहेत. ‘आजपर्यंत रंगमंचावर कधीही आले नव्हते असे अद्वितीय कारागृहनाट्य’ अशा शब्दांत अनेक समीक्षकांनी या नाटकाला गौरवले आहे. ‘फर्जंद’सारखा मराठी युद्धपट देणारे दिग्पाल लांजेकर यांनी या नाटकाचे लेखन, दिग्दर्शन केले आहे. यात मालिकांतील अजिंक्य ननावरे, शार्दूल आपटे, बिपिन सुर्वे आदी लोकप्रिय कलाकारांचा सहभाग आहे. 

(‘हे मृत्युंजय’ या नाटकाविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

सावरकरांची ई-बुक्स मोफत :
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक ट्रस्टतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या समग्र साहित्यापैकी बहुतांश पुस्तके ई-बुक स्वरूपात बुकगंगा डॉट कॉम या पोर्टलवर मोफत उपलब्ध आहेत. ती डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. बुकगंगाच्या मोबाइल अॅप्लिकेशनवरूनही ती डाउनलोड करता येतील.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZTECA
 I see the photo of V D Sawarkar at Redfort Delhi...Also I read 15 sentences regarding Sawarkar....I was very proud of him .Though the sawarkar the konkani Ratnagirian..my salute to him.
Similar Posts
सावरकरांवरील ‘हे मृत्युंजय’ नाटकाचा मे महिन्यात रत्नागिरीत प्रयोग रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अंदमान शिक्षेच्या कालावधीवर आधारित असलेल्या ‘हे मृत्युंजय’ या नाटकाचा प्रयोग मे महिन्यात रत्नागिरीत होणार आहे. नाटकाच्या तिकिटांची विक्री होणार नसून, नाटक पाहिल्यावर प्रेक्षकांनी स्वेच्छामूल्य द्यायचे आहे. मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे
सावरकर जयंतीला त्यांच्या नातीचा रत्नागिरीत विशेष कार्यक्रम रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची नात शाहीर विनता जोशी यांचा ‘नमन वीरतेला’ हा विशेष कार्यक्रम सावरकरांची कर्मभूमी असलेल्या रत्नागिरीत आयोजित करण्यात आला आहे. २८ मे रोजी सायंकाळी पाच वाजता रत्नागिरीतील पतित पावन मंदिरात हा कार्यक्रम होणार आहे.
सावरकरांची नात म्हणून लंडनमध्ये तिरंगा फडकवताना अभिमान वाटला रत्नागिरी : ‘ज्या ब्रिटिशांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर अनन्वित अत्याचार केले, त्याच ब्रिटिशांच्या लंडनमध्ये सावरकरांची नात म्हणून भारताचा तिरंगा फडकवण्याचे भाग्य मला गेल्या वर्षी लाभले. त्या वेळी ऊर अभिमानाने भरून आला होता,’ अशा शब्दांत शाहीर विनता जोशी यांनी सावरकरांची कर्मभूमी असलेल्या रत्नागिरीत आपल्या भावना व्यक्त केल्या
अंदमान-निकोबारला पर्यावरणपूरक सुविधांची भेट पोर्ट ब्लेअर : रमणीय समुद्रकिनारे, स्वच्छ, शुद्ध हवा,पाणी अशा निसर्गसंपन्न अंदमान-निकोबार बेटांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यावरणपूरक सोयीसुविधा देणाऱ्या विविध विकास योजनांची पायाभरणी रविवारी, ३० डिसेंबर २०१८ रोजी केली; तसेच अंदमान-निकोबार बेटांवरील रॉस, नील आणि हॅवलॉक या द्वीपांची नावे बदलण्याची घोषणाही केली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language